इराणकडून इस्रायलवर आता कधीही होऊ शकते आक्रमण !

बगदाद (इराक) – येत्या २४ घंट्यांत इराण इस्रायलवर आक्रमण करू शकतो, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सौदी अरेबिया, तुर्कीये, चीन आणि युरोपीय देश यांना इराणचे आक्रमण रोखण्यासाठी साहाय्य मागितले आहे.

(सौजन्य : CNN-News18)

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला इस्रायलला पोचले असून इराणने आक्रमण केल्यास ते इस्रायलला मार्गदर्शन करणार आहेत. इस्रायलने सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर केलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी इराण इस्रायलवर आक्रमण करणार आहे, असे त्याने आधीच घोषित केलेले आहे.

सौजन्य TV9 Bharatvarsh

दुसरीकडे इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने लेबनॉनमधून  इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले आहे. इस्रायल सैन्याच्या दाव्यानुसार त्यांनी एअर डिफेन्स सिस्टिमने ४० रॉकेट व २ ड्रोन पाडले आहेत.

संपादकीय भूमिका 

रशिया-युक्रेन आणि हमास-इस्रायल यांच्यानंतर आता इराण-इस्रालय असे युद्ध चालू झाल्यास जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !