युक्रेनची क्षेपणास्त्रे संपत आहेत ! – झेलेंस्की

युक्रेनचे दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या खार्किववर रशियाचे हवाई आक्रमण !

झेलेंस्की

कीव्ह (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर तीव्र आक्रमण चालूच ठेवले, तर आमची क्षेपणास्त्रे संपुष्टात येतील. आमच्याकडे आता लढण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत, पण ते लवकरच संपतील, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केले. ६ एप्रिलच्या रात्री युक्रेनचे राजधानी कीव्हनंतरचे दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या खार्किव शहरावर रशियाने केलेल्या आक्रमणात ८ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण घायाळ झाले. रात्रभर हे आक्रमण चालू होते.

सौजन्य  WION

१. झेलेंस्की यांनी त्यांच्या एका व्हिडिओ संदेशात पुढे म्हटले की, परिस्थिती बिकट होत चालली आहे. कुणाचे रक्षण करायचे, हे ठरवण्यात सैनिकांना कठीण जात आहे. आम्हाला अमेरिकी ‘पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम’ची २५ ठिकाणी आवश्यकता आहे.

२. ही प्रणाली आकाशातून येणारा कोणताही धोका ओळखू शकते आणि त्याचा प्रतिकार करू शकते. गेल्या वर्षभरापासून अमेरिकेने युक्रेनला कोणतेही अर्थसाहाय्य केलेले नाही. बायडेन सरकारला रिपब्लिकन पक्षाकडून विरोध होत असल्याने हे साहाय्य दिले गेलेले नाही.

३. युक्रेनचे म्हणणे आहे की, जोपर्यंत रशिया त्यांच्या राज्यांवरचा ताबा काढून घेत नाही, तोपर्यंत ते आक्रमणे चालूच ठेवतील, तर रशिया युक्रेनी राज्यांवरचा ताबा सोडू इच्छित नाही.