मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी  !

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

पुणे – सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ३ दिवस बंदी घालण्यात आली आहे.

वाढलेल्या तापमानामुळे वाहनचालकांना इंजिन अतिगरम होणे, टायर फुटणे, वाहनांना आग लागणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीचा स्फोट होणे अशा शक्यता निर्माण होतात. अशातच अवजड वाहने महामार्गावर असल्यास वाहतूककोंडी होते. मागील वाहने अधिक तापतात. अवजड वाहनांमध्ये उष्णतेमुळे बिघाड होण्याची शक्यता असते. या सर्व परिणामांचा विचार करून बंदी घातली आहे.