सनातनच्या साधिका सौ. लीला निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार घोषित !

सौ. लीला निंबाळकर

सातारा, ५ एप्रिल (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका तथा माजी नगरसेविका सौ. लीला अरुण निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार घोषित झाला आहे. ‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार सौ. लीला निंबाळकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ७ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालय येथे हा सोहळा होणार आहे. ‘राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे’, असे पुरस्कार निवड समितीने कळवले आहे. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे. सनातनच्या मार्गदर्शनानुसार नि:स्वार्थपणे केलेल्या सेवेची पोचपावती प.पू. गुरुदेवांनी दिली आहे’, असे मनोगत सौ. लीला निंबाळकर यांनी व्यक्त केले.