(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण)
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांतील फयाज खान नावाच्या पोलीस हवालादाराने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचे कौतुक करतांना व्हॉट्स अॅपवर २ स्टेटस प्रसारित केले. यांत त्याने मुख्तार अन्सारीला ‘शेर-ए-पूर्वांचल’ (उत्तरप्रदेशातील पूर्व भागाला पूर्वांचल म्हणतात) असे संबोधले. या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी फयाज खान याच्या बडतर्फीचा अहवाला निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. निवडणूक आयोगाच्या अनुमतीनंतर खान याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
सौजन्य Nation One News
संपादकीय भूमिकाधर्माच्या आधारे कुख्यात गुंडाचे समर्थन करणारे मुसलमान पोलीस जनतेचे विशेषतः हिंदूंचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? |