आपल्यात गुण आल्यावर ‘ते गुण योगेश्वर भगवान माझ्या पाठीशी उभा आहे; म्हणून आले’, ही भावना असावी. ही भावना असली की, अहंकाराचा त्रास होत नाही. त्यामुळे अहंकार आला, तरी ‘त्याच्या कारणाच्या पाठीशी ईश्वरीशक्ती आहे’, याचे सतत भान ठेवा. भवसागराचे शेवटचे टोक, म्हणजे अहंकार. या जगात २ टोके आहेत. एक गुलाम आणि दुसरे राजा. जो बायकोचा, सत्तेचा किंवा इतरांचा झाला, तो गुलाम आणि जो भगवंताचा झाला, तो राजा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ‘गुण, सत्ता देणारी, कोणतीतरी शक्ती आहे. तिचे विस्मरण होता कामा नये. ते झाले नाही, तर अहंकार त्रास देत नाही.’
(साभार : ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)
परिश्रमाने संपत्ती मिळवावी, असे सांगणारी श्रेष्ठ भारतीय संस्कृती !
‘वडिलांची संपत्ती (इस्टेट) मिळाली, तरी ती भगवंताच्या कामासाठी वापरा आणि तुम्ही स्वतःच्या परिश्रमाने मिळवा’, असे भारतीय संस्कृती सांगते.’
(साभार : ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)