दुबई – ‘भाषा सहोदरी हिंदी (न्यास)’ आणि ‘भारतीय उच्चायोग, दुबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत आयोजित १० व्या आंततराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात अखिल विश्व सरयूपारीण ब्राह्मण महासभा नागपूरचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामनारायण मिश्र यांनी हिंदी ज्ञान आणि परंपरा यांच्यावर आधारित आलेख पत्र प्रस्तुत केले. श्री. मिश्र यांना त्यांच्या हिंदी भाषेतील उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अधिवेशनात भारताच्या २६ प्रदेशांसह विदेशातूनही पुष्कळ भारतियांनी सहभाग घेतला. ४० टक्क्यांहून अधिक हिंदी भाषिकांनी हिंदी भाषेतून त्यांची पत्रे वाचली आणि हिंदी भाषेच्या प्रचारासाठी देत असलेल्या योगदानाविषयी सांगितले.