लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी येथील सीबीआय न्यायालयाने सर्व ७ आरोपींना दोषी ठरवले आहे. यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
DESIGNATED CBI COURT AT LUCKNOW CONVICTS SEVEN ACCUSED AND SENTENCES SIX PRESENT IN COURT TO LIFE IMPRISONMENT WITH TOTAL FINE OF RS. 11.65 LAKH IN A CASE RELATED TO MURDER OF SH. RAJU PAL THEN SITTING MLA OF UP pic.twitter.com/O18r2Ezmbj
— Central Bureau of Investigation (India) (@CBIHeadquarters) March 29, 2024
यापूर्वी पोलिसांच्या कह्यात असतांना हत्या करण्यात आलेले कुख्यात गुंड आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हेही यात आरोपी होते.