होळीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातही झाले सहभागी
लंडन – ब्रिटनमध्ये या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मजूर पक्षाने (लेबर पार्टीने) भारताच्या अंतर्गत घडामोडींवर त्याच्या भूमिकेत मोठे पालट केले आहेत. विरोधी मजूर पक्ष ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ब्रिटिश-इंडियन थिंक टँक १९२८’ संस्थेने या आठवड्यात लंडनमध्ये होळीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लेबर पार्टीचे प्रमुख केयर स्टार्मर या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत लंडनचे महापौर सादिक खान आणि त्यांचे अन्य सहकारी हेही सहभागी झाले होते. या वेळी स्टार्मर यांनी ब्रिटनमधील भारतीय समुदायाला होळीनिमित्त एक खास संदेश दिला. ब्रिटनच्या उत्कर्षासाठी हिंदूंनी दिलेल्या योगदानाविषयी त्यांनी हिंदूंचे आभार मानले आहेत.
होळीचा सण ‘राष्ट्रीय पुनरुत्थान’चा संदेश देण्यासाठी एक उत्तम संधी ! – केयर स्टार्मर
स्टार्मर यांनी या कार्यक्रमात सांगितले की, होळी हा उत्सव पक्षाचा ‘राष्ट्रीय पुनरुत्थान’चा संदेश देण्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारतासोबतचे संबंध सुधारावेत, यासाठी मजूर पक्ष त्याची पालटलेली भूमिका भारतीय समुदायाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.
ब्रिटनमधील निवडणुकीपूर्वीच्या जनमत चाचणीमध्ये विरोधी लेबर पार्टी सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
संपादकीय भूमिका
|