Holi China Loss : यंदा होळीमध्ये चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका !

भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !

नवी देहली – व्यापारी संघटना ‘कॅट’कडून (‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया’कडून) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय ५० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. देहलीत ५ सहस्र कोटी रुपयांच्या सामानांची विक्री झाली आहे; परंतु यंदा चिनी मालाचा वापर अल्प झाला. यामुळे चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चिनी मालावर बहिष्कार टाकला.

होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल आदी वस्तू चीनमधून आयात केल्या जात होत्या. त्याचा लाभ चीनला होत होता; परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहे. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ला (स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याला) पाठिंबा दिला. त्याचा लाभ देशातील व्यापार्‍यांना झाला आहे.