महाराष्ट्रातील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्व विभागाकडून आडकाठीचा प्रयत्न !

मंदिरांचे काम पूर्ण होण्याविषयी साशंकता !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील ९ प्राचीन मंदिरे, तसेच लेणी-शिल्पे यांचे संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे काम सरकारने गेल्या २ वर्षांपासून हाती घेतले होते; मात्र त्यातील कार्ला येथील श्री एकविरादेवीच्या मंदिरासह ५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्व विभागाने आडकाठी आणल्याने ‘ते काम कधी पूर्ण होईल ?’ असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कार्ला येथील श्री एकविरादेवीचे मंदिर, रत्नागिरीतील श्री धूतपापेश्‍वर मंदिर, कोल्हापूरमधील खिद्रापूरचे श्री कोपेश्‍वर मंदिर, सिन्नर (नाशिक) येथील श्री गोंदेश्‍वर मंदिर, छत्रपती संभाजीनगरमधील श्री खंडोबा मंदिर, बीडचे पुरुषोत्तमपुरी येथील भगवान श्री पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीतील लासूर येथील श्री  आनंदेश्‍वर मंदिर, गडचिरोलीतील श्री मार्कंडेश्‍वर मंदिर, तसेच सातारा येथील श्री उत्तेश्‍वर मंदिर या मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार होते; मात्र केवळ धूतपापेश्‍वर, खंडोबा, भगवान पुरुषोत्तम आणि उत्तेश्‍वर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामे चालू झाली आहेत.

संपादकीय भूमिका

  • मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा आणणारा भारतीय पुरातत्व विभाग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या कामात अडथळे आणण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या ! याविषयी आता समस्त हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !