श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसने त्याची शिकवण अंगिकारण्याचे केले आवाहन !

मुंबईतील सभेत राहुल गांधी यांचे सभेत संबोधन !

मुंबई – देशात काँग्रेसचे सरकार असतांना रामसेतू तोडण्याला अनुमती मिळावी, यासाठी काँग्रेसने प्रभु श्रीरामांचे अस्तित्वच नाकारले होते. वर्ष २००७ मध्ये ‘रामसेतू प्रभु श्रीराम यांनी निर्माण केला नाही’, असे सांगतांना काँग्रेसने प्रतिज्ञापत्राद्वारे थेट ‘राम काल्पनिक पात्र आहे’, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. आता त्याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र १७ मार्च या दिवशी शिवाजी पार्क मैदानावरील ‘इंडी’ आघाडीच्या सार्वजनिक सभेत रामाची शिकवण अंगिकारण्याचे आवाहन केले.

राहुल गांधी यांनी भाषणाच्या शेवटी ‘महात्मा गांधी, बुद्ध भगवान, राम यांनी ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडा’, असा संदेश दिला. राहुल गांधी यांनी भाषणाचा शेवटही रामाचा संदेश अंगिकारण्याचे आवाहन करत केला. यामुळे यापूर्वी श्रीरामाला काल्पनिक ठरणारी काँग्रेस आता निवडणुकीतील लाभासाठी रामाचे नाव घेत आहे का ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे !

संपादकीय भूमिका 

इंग्रजीत एक म्हण आहे जिचा मराठीतील अर्थ आहे – ‘तुम्ही कुणाला सतत मूर्ख बनवू शकत नाही !’ काँग्रेस हिंदूंना मूर्ख समजते का ? तिला जरी तसे वाटत असले, तरी हिंदूंनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे, हे राहुल गांधी यांनी विसरू नये !