रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. शशांक जोशी यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.
कोटी कोटी कृतज्ञ देवा, कृतज्ञ तव चरणी ।
कृपा तुझी वर्णन करण्या कुंठित झाली मती ।। १ ।।
तुझ्या कृपेच्या वर्षावाने माझ्यावरी ऋण इतके व्हावे ।
माझे स्थूल आणि सूक्ष्म देह जप्त तू करावे ।। २ ।।
तुझे सेवक बनूनी त्यांनी अखंड वर्तन करावे ।
ज्या योगे त्यांनी अखंड साधनारत रहावे ।। ३ ।।
त्यासाठी देवा, करी एक कृपा आम्हावरी ।
सर्व देह चरणी अर्पण्याची भावभक्ती द्यावी अंतरी ।। ४ ।।
आणि आहे एकची आता तुझ्या जवळ मागणे ।
शेवटच्या श्वासापर्यंत कृतज्ञताभावातच व्हावे जगणे ।। ५ ।।
– श्री. शशांक अरविंद जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |