मुंबई – यापुढे शासकीय कागदपत्रांवर वडिलांसह आईचे नाव बंधनकारक केले आहे. ११ मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा नाव लिहिण्याचा क्रम असणार आहे. १ मे २०२४ या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंद अशी करावी लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक, महसुली कागदपत्रे, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्ज सूची शासकीय अर्जावर आणि अन्य कागदपत्रांवर वरीलप्रमाणे नाव लिहिणे बंधनकारक आहे. अनाथ किंवा अपवादात्मक प्रसंगी नियमाला सवलत असेल. विवाहितांनी नाव लिहितांना स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि नंतर आडनाव हा यापूर्वीचा क्रम कायम असेल.