रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अमरावती येथील श्री. सौरभ सोनटक्के यांना आलेल्या अनुभूती

५.८.२०२२ ते ७.८.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी श्री. सौरभ सोनटक्के यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. त्रासदायक अनुभूती

१ अ. शिबिराला निघण्यापूर्वी : ‘शिबिरासाठी निघतांना दोन दिवस आधी मला काहीच सुचत नव्हते, तसेच मला थकवा आणि निरुत्साह जाणवत होता.

१ आ. शिबिराच्या पहिल्या दिवशी : सायंकाळनंतर मला मळमळले आणि रात्री उलट्याही झाल्या.

१ इ. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी : दुसर्‍या दिवशी सकाळीसुद्धा मला अस्वस्थ वाटत होते. ‘आश्रमात जाऊया नको. झोपून राहूया’, असे मला वाटत होते. आश्रमात गेल्यावर माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली. ध्यानमंदिरात आरती चालू होती. त्या वेळी ‘आता मी चक्कर येऊन पडेन’, असे मला वाटत होते.

२. चांगल्या अनुभूती

२ अ. शिबिराच्या आदल्या रात्री : माझी रात्री झोपण्याची व्यवस्था आश्रमातील एका खोलीत केली होती. त्या वेळी तेथील लादी मला पूर्णपणे मऊ गादीप्रमाणे वाटली.

२ आ. शिबिराच्या पहिल्या दिवशी : रामनाथी आश्रमातील हनुमानाच्या मूर्तीजवळ गेल्यावर समुद्राच्या लाटांचा आवाज आला.

२ इ. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी ध्यानमंदिरात : मी आश्रमाच्या ध्यानमंदिरात जाऊन जप केला. तेव्हा ‘नामजप करतच रहावा. तेथून उठूच नये’, असे मला वाटत होते. इतर वेळी नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ विचार येतात; पण त्या दिवशी मात्र माझे मन निर्विचार होऊन नामजप झाला. तेव्हा मला पुष्कळ बरे वाटले.

२ ई. तिसर्‍या दिवशी शिबिराच्या ठिकाणी

१. सकाळपासून मला फार प्रसन्न वाटत होते.

२. कार्यशाळेत पुष्कळ प्रेमभाव आणि आपुलकी जाणवत होती.

३. ‘सभागृहातील प्रत्येक खांबाच्या जागी साक्षात् गुरुदेव उभे आहेत’, असे जाणवले.

४. शेवटी शिबिराची सांगता करतांना माझा भाव जागृत होऊन मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.’

– श्री. सौरभ गजानन सोनटक्के (वय २७ वर्षे), अमरावती (८.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक