उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५० टक्के आध्यात्मिक पातळीची सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील कु. भाविनी द्विवेदी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. भाविनी अनुज द्विवेदी ही या पिढीतील एक आहे !

जून २०२३ मध्ये सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील सौ. कुमुद अनुज द्विवेदी आणि त्यांची कन्या कु. भाविनी अनुज द्विवेदी (वय ११ वर्षे) काही दिवसांसाठी वाराणसी येथील सेवाकेंद्रात गेल्या होत्या. सौ. कुमुद यांना भाविनीचे जाणवलेले गुण आणि कु. भाविनीला वाराणसी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर अन् श्रीराममंदिर येथे आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. भाविनी अनुज द्विवेदी
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. कु. भाविनीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. सात्त्विकतेची ओढ

१. ‘कु. भाविनी लहानपणापासून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने अत्यंत लक्षपूर्वक ऐकते.

२. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून तिला पुष्कळ आनंद होत असे आणि ती त्या छायाचित्राकडे आकर्षित होत असे.

१ आ. साधनेची ओढ : ती साधनेविषयी सांगितलेली प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःच्या चुका लिहिते आणि नामजपादी उपाय करते. ती साधनेशी संबंधित विषय इतरांना सांगण्याचाही प्रयत्न करते.

१ इ. अन्य गुण : तिच्यामध्ये ‘जिज्ञासा, इतरांचा विचार करणे, प्रीती’, असे अनेक गुण आहेत.

१ ई. भाव : तिची भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्यावर पूर्ण श्रद्धा असून ती त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलते.

१ उ. स्वभावदोष : एकाग्रता नसणे’

– सौ. कुमुद द्विवेदी (कु. भाविनी हिची आई)

२. कु. भाविनीला आलेल्या अनुभूती

अ. ‘ध्यानमंदिरात तेवत असलेल्या दिव्यात मला लाल रंगाची ज्योत दिसली.

आ. सेवाकेंद्रातील श्रीराममंदिरात गेल्यावर ‘श्रीराम माझ्याकडे पाहून हसले’, असे मला जाणवले.

इ. एकदा मला भगवान श्रीरामाच्या कपाळावर लावलेल्या कुंकवामध्ये तेजस्वी प्रकाश दिसला.

ई. मी श्रीरामाला प्रार्थना केली, ‘मला या मंदिराचे दार पुसण्याची सेवा मिळू दे’ आणि दुसर्‍याच दिवशी मला ती सेवा मिळाली.’

उ. एके दिवशी मला ‘हनुमान माझ्याकडे पहात आहेत’, असे जाणवले.’

– कु. भाविनी अनुज द्विवेदी

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १८.११.२०२३)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक