Geert Wilders Support Nupur Sharma : भारतात आल्यावर नूपुर शर्मा यांची भेट घेणार !

नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांचे विधान !

नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स व भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा

अ‍ॅम्स्टरडॅम्स (नेदरलँड्स) – येथील ‘पार्टी फॉर फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे भावी पंतप्रधान खासदार गीर्ट विल्डर्स यांनी भाजपने निलंबित केलेल्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यासाठी संदेश लिहिला आहे. यामध्ये त्यांनी शर्मा यांना पाठिंबा देण्यासमवेतच त्यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

१. गीर्ट विल्डर्स यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी पराक्रमी नूपुर शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी वैयक्तिक संदेश पाठवला आहे. सत्य बोलल्यामुळे  इस्लामवादी त्यांना धमकावत आहेत. स्वातंत्र्याचे समर्थन करणार्‍या संपूर्ण जगातील सर्व लोकांनी नूपुर यांना पाठिंबा दिला पाहिजे. जेव्हा मी भारताला भेट देईन, तेव्हा मला त्यांना भेटायचे आहे.

२. गीर्ट विल्डर्स यांनी यापूर्वीही नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबरांविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांचा बचाव केला होता. ‘पैगंबर महंमद यांच्याविषयी सत्य  बोलल्यासाठी नूपुर यांनी कधीही क्षमा मागू नये’, असे म्हटले होते. तसेच ‘जगाला नूपुर शर्मा यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांना नोबेल पारितोषिक द्यायला हवे. भारत हा हिंदु देश आहे आणि भारत सरकारने इस्लामी द्वेषापासून हिंदूंचे संरक्षण केले पाहिजे’, असेही म्हटले होते.

संपादकीय भूमिका

भारतातील किती हिंदु नेत्यांनी नूपुर शर्मा यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे ?