VHPA On Gyanvapi : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त !

वॉशिंग्टन – ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्याच्या सर्वेक्षणात अनेक तथ्ये उघड केली. त्यावरून ज्ञानवापी मशीद हिंदु मंदिर नष्ट करून बांधली गेल्याचे स्पष्ट झाले. पुराव्याच्या आधारे निकाल देणार्‍या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचे विश्‍व हिंदु परिषदेने कौतुक केले आहे.

अमेरिकन मुसलमान संघटनेकडून टीका !

‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ ने वाराणसी न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली आहे. मुस्लिम कौन्सिलने निवेदनात म्हटले आहे, ‘आम्ही आमचा इतिहास आणि संस्कृती पुसून टाकण्याच्या कोणत्याही प्रयत्नाच्या विरोधात आहोत. धर्माच्या राजकारणालाही आमचा विरोध आहे. न्यायालयाचा निर्णय म्हणजे भारतातील २० कोटी मुसलमानांच्या हक्कांवर आणखी एक आक्रमण आहे. (हिंदूंचा इतिहास आणि संस्कृती पुसून टाकली, तर चालते काय ? हिंदूंची संस्कृती दडपून ती आपलीच संस्कृती आहे, असे खोटे सांगणार्‍या मुसलमानांचे पितळ न्यायालयानेच उघडे पाडले आहे ! – संपादक)