लंडन – ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नाही. त्यामुळे ब्रिटनमधील सुमारे ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. अनेक मंदिरांमध्ये अनेक कामे ठप्प झाली आहेत. यामुळे तेथील हिंदू सुनक सरकारवर अप्रसन्न आहेत. ब्रिटनमध्ये सुमारे २० लाख भारतीय हिंदू राहतात. त्यामुळे तेथील मंदिरांमधील धार्मिक विधी करण्यासह तेथील हिंदूंमध्ये नित्यनेमाने होणारे धार्मिक विधी, विवाह आदी समारंभांना पुरोहितांची आवश्यकता असते; मात्र पुरोहितांना व्हिसा न मिळाल्याने हिंदूंना अडचणी येत आहेत. ‘ब्रिटन सरकारने व्हिसा जारी करण्याची प्रक्रिया वेगवान करणे अपेक्षित होते. हिंदु असल्याने ऋषी सुनक यांना आमच्या समस्या समजतील, असे वाटले होते; परंतु सरकार तसे करण्यात आजवर अपयशी ठरले आहे’, असे बर्मिंगहॅममधील लक्ष्मीनारायण मंदिराचे साहाय्यक पुजारी सुनील शर्मा यांनी म्हटले आहे.
व्हिसा न दिल्याने बंद पडलेली मंदिरे१. लक्ष्मीनारायण मंदिर, बर्मिंगहॅम २. राम मंदिर, बर्मिंगहॅम ३. श्रीजीधाम हवेली, लीसेस्टर |
‘टियर-५’ धार्मिक व्हिसाचा कालावधी वाढवण्याची मागणी
ब्रिटनमधील धर्मगुरूंसाठी ‘टियर-५’ धार्मिक व्हिसा जारी केला जातो. हा तात्पुरता व्हिसा आहे. मंदिर समिती नवीन पुजार्यासाठी व्हिसाचा कालावधी संपण्याच्या ६ मास आधी व्हिसासाठी अर्ज करते; परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये त्याला मान्यता मिळत नाही. ‘टियर-५’ धार्मिक व्हिसाचा कालावधी २ वरून ३ वर्षांपर्यंत वाढवावा, अशी मागणी भारतियांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|