मालेगाव – शहरात ३०० कोटी रुपयांची वीजचोरी होते. वीजचोरीचा पैसा लव्ह आणि लँड जिहादसाठी वापरला जातो, असे वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरी करून तो पैसा आतंकवादी कारवायांमध्ये वापरला जात असेल, तर तो आम्ही खपवून घेणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.
सौजन्य : मॅक्स महाराष्ट्र
या संदर्भात राणे म्हणाले की, मालेगावमध्ये जी वीजचोरी होते, या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी अधिकारी त्या मोहल्ल्यातही जाऊ शकत नाहीत. देयक वसूल करण्यासाठीही जाऊ शकत नाहीत. एवढी दहशत या मोहल्ल्यात जिहाद्यांनी निर्माण केली आहे. या संदर्भातील पैसा लव्ह आणि लँड जिहादसाठी वापरला जात असल्याची माहिती आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्तालय बांधण्यासाठी फडणवीस यांनी आम्हाला होकार दिला आहे.
संपादकीय भूमिकामालेगावमध्ये किती वर्षे वीज देयके वसूल केली जात नाहीत ? याविषयी संबंधित अधिकार्यांनी सरकारला का कळवले नाही ? कि कळवूनही त्यावर काही उपाययोजना निघाली नाही ? या संदर्भातील उत्तरे महावितरण आणि पोलीस प्रशासन या दोघांनीही दिली पाहिजेत ! |