‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर सहसाधकाविषयी मनात आलेल्या प्रतिक्रियेचा परिणाम आणि ताण उणावून मन हलके अन् सकारात्मक होणे

श्री. महेंद्र सहस्रबुद्धे

‘१४.५.२०२१ या दिवशी माझ्यातील ‘अपेक्षा करणे आणि बहिर्मुखता’, या अहंच्या पैलूंमुळे माझ्या मनात सहसाधकाविषयी प्रतिक्रिया आली. इतर वेळीही माझ्या मनात साधकांविषयी प्रतिक्रिया येतात आणि १ – २ मिनिटांनंतर त्या न्यून होतात, तसेच बर्‍याचदा एखाद्या प्रतिक्रियेचा परिणाम माझ्या मनावर अधिक काळ रहातो. या प्रसंगात आलेल्या प्रतिक्रियेचा परिणाम माझ्या मनावर जवळजवळ २० – २५ मिनिटे होता. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी ‘या विचारातून तुम्हीच मला बाहेर काढा’, अशी प्रार्थना झाली. त्या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ या नामजपाविषयी चौकट प्रसिद्ध झाली होती. त्या चौकटीची आठवण येऊन मी ‘निर्विचार’ हा नामजप ५ – ७ मिनिटे केला.  त्यानंतर माझ्या मनातील प्रतिक्रियेचा परिणाम आणि ताण दोन्ही ९० टक्के न्यून झाले. माझे मन हलके आणि सकारात्मक झाले. ‘परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला या नामजपाविषयी अनुभूती घेता आली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. महेंद्र सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक