Indian Navy Rescue Operation : भारतीय नौदलाकडून आणखी एका इराणी नौकेची समुद्री दरोडेखोरांकडून सुटका

नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !

मुंबई – सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांच्या (चाच्यांच्या) कह्यात असलेल्या आणखी एका इराणी नौकेची भारतीय नौदलाने सुटका केली. गेल्या २ दिवसांत भारतीय नौदलाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.

अरबी समुद्रात ११ दरोडेखोरांनी या नौकेचे अपहरण केले होते. याची माहिती भारतीय नौदलाला मिळाल्यावर नौकेच्या सुटकेसाठी भारतीय युद्धनौका आय.एन्.एस्. सुमित्रा पाठवण्यात आली. या युद्धनौकेने कारवाई करत दरोडेखोरांना हाकलून नौकेची सुटका केली. विशेष म्हणजे या नौकेवर १९ पाकिस्तानी कर्मचारी होते.