सप्तर्षींनी साधकांना आपत्काळासाठी करायला सांगितलेल्या मंत्रजपाविषयी आलेली अनुभूती

१३.१.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सप्तर्षींची ‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात घासावे, जेणेकरून दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून श्रीविष्णूचे स्मरण करून ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम्’ हा मंत्र म्हणावा.’ या संदेशाची चौकट प्रसिद्ध झाली होती. हा मंत्रजप करतांना सौ. अनिता अरूण करमळकर यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.

सौ. अनिता करमळकर

१. सप्तर्षींनी सांगितलेला मंत्र म्हटल्यावर घरात आलेला भारद्वाज पक्षी घरातून बाहेर निघून जाणे

‘१३.१.२०२४ या दिवशी सकाळी ८ वाजता आमच्या घरातील देवघर असलेल्या खोलीमध्ये भारद्वाज पक्षी आला आणि तो देव्हार्‍यासमोर बसला. त्याच वेळी मी आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे यांनी गटावर पाठवलेला सप्तर्षींचा संदेश वाचला. त्यानुसार मी लगेचच गुरुमाऊलींना प्रार्थना करून सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम् ।’ हा मंत्र म्हटला. माझा ११ वेळा मंत्र म्हणून पूर्ण होताच घरातील देवघरासमोर थांबलेला भारद्वाज पक्षी घरातून बाहेर निघून गेला.

२. कृतज्ञता

यातून देवाने सप्तर्षींच्या संदेशाचे महत्त्व माझ्या लक्षात आणून दिले आणि मला तो संदेश वाचण्याची बुद्धी देऊन लगेच माझ्याकडून तशी कृती करून घेऊन ही अनुभूती दिली’, यासाठी मी गुरुदेव आणि सप्तर्षी यांच्या चरणी शिरसाष्टांग नमन करून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अनिता अरुण करमळकर, कोल्हापूर (१३.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक