विश्वात्मक भारत हो आनंदी ।
हीच प्रार्थना प्रभु श्रीरामा तव चरणी ।।
जय जय रघुनंदन श्रीरामा ।
आपुला त्रिवार जयजयकार ।। धृ. ।।
त्रेतायुगी अवतार आपुला ।
विविध रूपांत आदर्श दाविला ।। १ ।।
आदर्श पुत्र आदर्श भ्राता ।
आदर्श भर्ता आदर्श पिता ।। २ ।।
आदर्श मित्र आदर्श शत्रू ।
आदर्श सखा आदर्श राजा ।। ३ ।।
दहा सहस्र वर्षे प्रदीर्घ झाले ।
असे श्री रामराज्य आपुले ।। ४ ।।
दशोत्तर चार वर्ष भोगीला ।
त्रेतायुगी वनवास ।। ५ ।।
अवतार समाप्तीनंतर कलियुगी ।
पाचशे वर्ष वनवास ।। ६ ।।
त्या वनवासा आम्हीच पापी जबाबदार ।
क्षमा करूनी करा सत्वर पाप्यांचा संहार ।। ७ ।।
प्रभु श्रीरामाचे मंदिर जाहले ।
भव्य दिव्य असे मनोहर ।। ८ ।।
विश्वात्मक भारत हो आनंदी ।
हीच प्रार्थना प्रभु श्रीरामा तव चरणी ।। ९ ।।
वनवास आता संपला प्रभूंचा ।
तथैव त्यांच्या प्रिय जनांचा ।। १० ।।
आश्रय मिळावा श्री चरणांचा ।
जीवनी हा ठेवा आनंदाचा ।। ११ ।।
जय जय रघुनंदन श्रीरामा ।
आपुला त्रिवार जयजयकार ।। धृ.।।
।। जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।।
– श्री दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्ष ), कोलगाव, सावंतवाडी. (३०.१२.२०२३)