रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरासाठी आल्यावर शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. रागिणी हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. शिबिर चालू असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. आम्ही सकाळी व्यायाम करत असलेल्या ठिकाणी सभोवताली मंदिरे होती. तेथील देवतांचे चैतन्य जागृत होत होते.

आ. रामनाथी आश्रमातील ‘धर्मध्वज’ पहातांना वीरवृत्ती जागृत होत होती.

इ. मी व्यायाम करतांना ‘साक्षात् आदिशक्ती दुर्गामाता माझ्या समोर उभी राहून शक्ती आणि चैतन्य देत आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा मला प्रकार उत्तम रितीने व्यायाम करता आला.

कु. रागिणी

२. आश्रम पहातांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आश्रमातील सर्व व्यवस्थांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

आ. साधकांना सेवा करतांना पाहून माझ्यात असलेला आळस, गांभीर्याचा अभाव, बहिर्मुखता आणि वेळेचे पालन न करणे इत्यादी स्वभावदोष माझ्या लक्षात आले.

इ. स्वभावदोषांची सूची बनवणे आणि स्वयंसूचना देणे यांविषयी माझ्यात गांभीर्य निर्माण झाले.

ई. ‘साधकांचा सेवेत समर्पणभाव आहे, तसाच माझ्यातही असला पाहिजे’, असे मला वाटले.

उ. ‘आश्रम पहाणे आणि संतांचे दर्शन हे मी चैतन्याच्या स्तरावर अनुभवत आहे’, असे मला जाणवले.

ऊ. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सूक्ष्मातून आशीर्वाद दिले’, असे मला जाणवले.

ए. ‘मी कृतीच्या स्तरावर चांगले प्रयत्न केले पाहिजेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंना संघटित केले पाहिजे. मी ते करू शकते’, असे मला वाटले आणि ‘राष्ट्र अन् धर्म यांसाठी सेवा करावी’, अशी मला स्फूर्ती मिळाली.’

गुरुचरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करते.’

– कु. रागिणी, शिवमोग्गा, कर्नाटक. (२१.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक