स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांवर रचलेली ४ कवने

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी काल्पनिक कहाण्यांची आवश्यकता नाही. सावरकर यांच्यावरील कपोलकल्पित कहाण्यांवर विश्वास ठेवू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांवर एकूण ४ कवने रचली आहेत.

१. ‘श्री शिवगीत’ हे गीत वर्ष १९०० मध्ये नाशिक येथे रचले आहे. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वय १७ वर्षे होते.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सावरकर यांनी वर्ष १९०२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतांना रचली. तेव्हा त्यांचे वय १९ वर्षे होते.

३. सावरकर यांनी छत्रपती शिवरायांवरील रचलेले तिसरे कवन त्र्यंबकेश्वर येथे ‘शिववीर’ म्हणून वर्ष १९०३ मध्ये रचले. तेव्हा त्यांचे वय २० वर्षे होते.

४. सावरकर यांचे प्रसिद्ध असे छत्रपती शिवरायांवरील ‘हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा’, हे गीत त्यांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असतांना वर्ष १९२६ मध्ये रचले आहे. तेव्हा त्यांचे वय ४३ वर्षांचे होते. (साभार : ‘समग्र सावरकर खंड ७ वा’ ग्रंथातून)

– श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे. (१०.१.२०२४)