Danish Kaneria : पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही श्रीराममंदिराविषयी प्रसारित केली पोस्ट !

कराची (पाकिस्तान) – ‘आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आता केवळ ८ दिवस उरले आहेत. बोला जय जय श्रीराम !’, अशी पोस्ट पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी अयोध्येत उभारल्या जाणार्‍या श्रीराममंदिराच्या संदर्भात सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहे. या पोस्टसमवेत स्वतःचे एक छायाचित्रही त्यांनी शेअर केले आहे. या छायाचित्रात ते भगवा झेंडा घेऊन उभे आहेत. या ध्वजावर श्रीरामाचे चित्र आणि मंदिर आहे.

दानिश कनेरिया यांनी ते पाकिस्तान क्रिकेट संघात असतांना त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास मुसलमान क्रिकेटपटू दबाव टाकत असल्याचे म्हटले होते. कनेरिया यांनी अनेकदा भारताच्या समर्थनार्थ वक्तव्ये केली आहेत. अलीकडेच मालदीव आणि भारत यांच्यातील वादावर त्यांनी पोस्ट प्रसारित केली होती.