Missionaries Illegal Girls Hostel : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीररित्या चालवण्यात येत आहे बालिका सुधारगृह !

  • बहुतांश हिंदु मुलींकडून करवून घेतले जात होते ख्रिस्ती धर्माचे पालन !

  • सुधारगृहातून २६ मुली बेपत्ता !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद !

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्‍या खासगी बालिका सुधारगृहात असलेल्या ६८ मुलींपैकी २६ मुली बेपत्ता असल्याची माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांना मिळाली. यानंतर त्यांनी येथे धाड घातली. त्या वेळी तेथेत्यांना अनेक चुकीच्या गोष्टी आढळून आल्या.

(चित्रावर क्लिक करा)

याची माहिती त्यांनी ‘एक्स’वर प्रसारित केली आहे. या बालिका सुधारगृहात ६ ते १८ वयोगटातील मुली रहातात. यांतील बहुतांश मुली हिंदु आहेत. मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संदर्भात बालिका सुधारगृहाचे संचालक मॅथ्यू यांनी म्हटले की, बेपत्ता झालेल्या मुलींविषयी त्यांना कुठलीही माहिती नाही.

सौजन्य : इंडिया टूडे 

कानूनगो यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर सापडलेल्या अनाथ हिंदु मुलींना सरकारला कोणतीही माहिती न देता या सुधारगृहात आणून ठेवून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचे पालन करवून घेतले जात होते. या संदर्भात पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे. येथे ६ ते १८ वयोगटातील ४० हून अधिक मुली हिंदु आहेत.

संपादकीय भूमिका 

  • मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
  • देशातील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या प्रत्येक कथित सामाजिक आणि शैक्षणिक कामांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, हेच यावरून लक्षात येते !