रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. अधिवक्त्या (श्रीमती) सिद्ध विद्या (उच्च न्यायालय मुंबई महाराष्ट्र), मुंबई   

अ. ‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही. आजपर्यंत जेवढ्या ठिकाणी गेले, तेथे काही ना काही त्रुटी दाखवून दिली होती; परंतु येथे तसे झाले नाही.’ (१७.६.२०२३)

२. श्री. आदेश चौधरी (संस्थापक अध्यक्ष, शंभुदुर्ग प्रतिष्ठान), पळसोली, कल्याण, जिल्हा ठाणे. 

अ. ‘सनातनचा आश्रम हे ऊर्जा, प्रेरणा आणि नवचैतन्य निर्माण करण्याचे शक्तीपीठ आहे. आश्रमात साधक सेवा करतांना पाहून मन हेलावून गेले.’

३. श्री. संजय गोपाळ चौधरी (महासचिव, शंभुदुर्ग प्रतिष्ठान), वाशिंद, कल्याण, जिल्हा ठाणे.  

अ. ‘आश्रम पाहून आपल्या हिंदु देवतांिवषयीची श्रद्धा द्विगुणित झाली. आश्रमाचे कार्य हृदयात घर करून गेले. अतिशय अप्रतिम अनुभव आला.’

४. अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंके (संस्थापक अध्यक्ष, साळुंके एंड असोसिएट् लॉ फर्म), पुणे 

अ. ‘या वेळी आश्रमदर्शन करतांना ‘सकारात्मक शक्तीची स्पंदने वाढली आहेत’, असे मला जाणवले.

आ. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची उर्मी वाढली.’

५. श्री. अशोक काशिद (सचिव, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान), पुणे 

अ. ‘आश्रम पाहून समाधान वाटले. माझ्या मनात ‘साधकांप्रमाणे सेवा करावी’, असा विचार आला.’

६. अधिवक्ता सुरेश कौदरे (प्रमुख विश्वस्त श्री क्षेत्र भिमाशंकर), ता. खेड, जिल्हा पुणे. 

अ. ‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. साधक मनापासून सेवा करतात आणि पाहुण्यांचे स्वागत उत्तम करतात आणि आश्रमाविषयी चांगल्याप्रकारे माहिती देत आहेत. ‘यातूनच हिंदु राष्ट्र उभारणीस फार साहाय्य होईल’, असे मला वाटते.’

७. श्री. सुरेश द. उपाख्य पप्पाजी पुराणिक (संस्थापक अध्यक्ष, जय शंकर प्रतिष्ठान), पुणे 

अ. ‘स्वतःमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या आश्रमात थोडा वेळ यावे. ‘ध्यानमंदिर ऊर्जेचे प्रमुख स्थान आहे’, असे वाटले.’

८. श्री. प्रकाश आत्माराम देशमुख (स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच), केडगाव, जि. पुणे.

अ. ‘आश्रम पाहून मन भरून आले. हिंदु धर्माला नवसंजीवनी मिळण्यासाठी पुनर्उत्थान होण्यासाठी आपल्या आश्रमातील सर्व कक्ष पाहून अतिशय आनंद झाला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १६.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक