नागपूरच्या संघ मुख्यालयाला चिनी दूतावासातील अधिकार्‍यांची भेट !

रा.स्व. संघाच्या मुख्यालय

नागपूर – डिसेंबर २०२३ मध्ये येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला चिनी दूतावासातील काही अधिकार्‍यांनी भेट दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. यात संघाच्या एका पदाधिकार्‍याने दुजोरा दिल्याचेही म्हटले आहे. एखाद्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या मुख्यालयाला अथवा कार्यालयाला चिनी अधिकार्‍यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दौर्‍यावर असल्याने चिनी अधिकार्‍यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही; मात्र संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने या अधिकार्‍यांचे स्वागत केले आणि त्यांना मुख्यालय दाखवले. ज्या अधिकार्‍यांनी ही भेट दिली, ते देहली आणि मुंबई येथील दूतावासात तैनात आहेत.