प्रथमोपचार शिबिराच्या वेळी कु. मृणाली यादव यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. मी एका रुग्णालयात परिचारिका आहे; मात्र मला ‘वैद्यकीय उपचार कसे करतात ?’, एवढेच ठाऊक होते. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मला प्रथमोपचार शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. मला प्रत्येक प्रात्यक्षिक प्रयोगात सहभागी करून घेऊन माझ्या मनातील आत्मविश्वास दृढ केला. माझ्यात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण केली.

२. सात्त्विक वातावरणामुळे माझ्यात सात्त्विकता निर्माण झाली.

३. माझ्यात भावाची निर्मिती करून मला अनुभूती दिल्या.

४. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘हे गुरुदेवा, साधनेच्या दृष्टीने माझे बोलणे, रहाणे आणि वागणे, यांत पालट झाला आहे. मी जे कधी स्वप्नात पाहिले नव्हते, ते तुमच्या कृपेने माझ्या कृतीत आले. माझी जीवनशैली अशीच राहू दे. मला नेहमी तुमच्या साधनेत मग्न ठेवा. आपला कृपाशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असू दे’, अशी मी तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना करते.

या शिबिरामुळे माझे मन प्रसन्न झाले. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मृणाली महेश यादव, सांगली (१२.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक