महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई !
मुंबई – एअर कार्गोमधून चादरीच्या नावाखाली विदेशी सिगारेटच्या तस्करीचा प्रयत्न करण्यात येत होता; पण महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने या प्रकरणात १६ लाख विदेशी सिगारेट जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत अडीच कोटी रुपये आहे. या प्रकरणी सीमाशुल्क दलाल काळूराम कोकणे याला अटक करण्यात आली आहे. तो मुंबईतील असल्फा गाव परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणात कोकणेला ७० सहस्र रुपये आगाऊ मिळाली असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. या सिगारेट चीनवरून दुबई आणि दुबईवरून मुंबईत आणण्यात आल्या होत्या.