प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा महापालिकेत ठिय्या !
कोल्हापूर – लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळ यांना येथील महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करत टाळे ठोकले. (कुलूप लावून बंद केले) मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ‘हे प्रार्थनास्थळ अनधिकृत असून त्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली होती. ‘महापालिकेने ‘टाळे ठोकण्या’ची केलेली कारवाई पुरेशी नसून हे प्रार्थनास्थळ अनधिकृत असल्याने ते पाडण्यात यावे’, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठांनी महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी प्रशासन इतके निष्क्रीय का ? – संपादक)
२६ डिसेंबरला या संदर्भात महापालिकेत बैठक झाली होती. या बैठकीत मरदरसा चालकांनी मदरसा आणि प्रार्थनास्थळ अनधिकृत असले, तरी ‘या संदर्भातील निर्णय होईपर्यंत ते बंद ठेवू’, अशी भूमिका घेतली होती, तर हिंदुत्वनिष्ठ संघटना कारवाईवर ठाम होत्या. या संदर्भात २७ डिसेंबरला महापालिकेचे अधिकारी पोलिसांसह लक्षतीर्थ वसाहतीत आले, तेव्हा त्यांना मदरसा आणि प्रार्थनास्थळ बंद अवस्थेत आढळले. यामुळे महापालिकेच्या अधिकार्यांनी जागेचा पंचनामा करून त्याला ‘सील’ केले.
संपादकीय भूमिकाराज्यातील अनधिकृत मदरसे आणि प्रार्थनास्थळे शोधून त्यांनाही टाळे ठोकून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक ! |