ड्रोनद्वारे नौकेवर आक्रमण केल्याचे प्रकरण
मुंबई – अरबी समुद्रात असतांना ड्रोनद्वारे आक्रमण झालेली व्यापारी नौका मुंबईच्या किनार्यावर पोचली. नौकेला ‘इंडियन कोस्ट गार्ड’च्या नौकेच्या माध्यमातून किनारी आणण्यात आले. या नौकेवर लायबेरिया देशाचा ध्वज होता. या नौकेत भारताचे २१, तर व्हिएतनामचा१, असे २२ नागरिक होते. या नौकेवर आक्रमण झाल्याच्या प्रकरणाचे अधिक अन्वेषण नौदल पथक करत आहे.
या नौकेवरील आक्रमणासाठी अमेरिकेने इराणला उत्तरदायी ठरवले होते. ‘इराणमधून सोडण्यात आलेल्या ड्रोनने नौकेवर आक्रमण केले होते’, असे अमेरिकेने म्हटले; पण इराणने हा दावा फेटाळून लावला होता.