Human Trafficking France : मानव तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने विमान रोखले !

विमानात होते ३०३ भारतीय प्रवासी

पॅरिस (फ्रान्स) – अमेरिका खंडातील निकाराग्वा येथे ३०३ भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारे विमान फ्रान्स सरकारने रोखले. हे विमान दुबईहून निकाराग्वा येथे जात होते. मानव तस्करीचा संशय असल्याने फ्रेंच सरकारने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रान्समधील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांनी ‘प्रवाशांची काळजी घेतली जात आहे. तांत्रिक तपासासाठी हे विमानाला रोखण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करत आहोत’, असे सांगितले.

संघटित गुन्ह्यांचे अन्वेषण करणार्‍या अन्वेषण यंत्रणांनी मानवी तस्करीचा संशय घेऊन तपास करून दोघांना अटक केली आहे. हे विमान रोमानियातील ‘लीजेड एअरलाईन्स’ आस्थापनाचे असून विमानाने दुबईहून उड्डाण केले होते.