Nawaz Sharif : आपला शेजारी देश चंद्रावर पोचला, तर आपण अजून भूमीवरून उठूही शकलेलो नाही ! – नवाझ शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून भारताचे कौतुक करणारे विधान !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आमचे शेजारी चंद्रावर पोचले; मात्र आम्ही भूमीवरून उठूही शकलेलो नाही. आपल्या पतनासाठी आपण स्वतःच उत्तरदायी आहोत, अन्यथा आपला देश एक वेगळ्या स्तरावर पोचला असता, असे विधान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पी.एम्.एल्.-एन्.) पक्षाचे नेते नवाझ शरीफ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.

शरीफ पुढे म्हणाले की, वर्ष २०१३ मध्ये देश विजेच्या भारनियमाच्या संकटाचा सामना करता होता. आम्ही हे संकट समाप्त केले होते. संपूर्ण पाकिस्तानमधून आतंकवाद संपवला, तसेच कराचीमध्ये शांतता निर्माण केली. (शरीफ यांचे विनोद ! – संपादक) नंतर विकासाचे युग चालू झाले; मात्र आताची महागाई पहाता आपण स्वतःच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. वर्ष २०१४ मध्ये आमच्या सरकारच्या काळात महागाई न्यून होती. त्या वेळी २ रुपयांना रोटी मिळत होती, ती आता ३० रुपयांना मिळत आहे.