बीजिंग (चीन) – चीनमधील गान्सू आणि किंघाई प्रांतांत १८ डिसेंबरच्या रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. यात ११६ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपामुळे पाणी आणि वीजेच्या तारा यांची मोठी हानी झाली. याखेरीज वाहतूक आणि दळणवळणही विस्कळीत झाले. या भूकंपाचे धक्के पाकिस्तानपर्यंत जाणवले.