Vivek Ramaswamy : ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे काम नाही !

‘हिंदु अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा होऊ शकतो ?’, या प्रश्‍नावर अमेरिकेतील खासदार विवेक रामास्वामी यांचे प्रत्युत्तर !

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे काम नाही, असे रोखठोक विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी केले. एका कार्यक्रमात रामास्वामी यांना ‘एक हिंदु राष्ट्रपती अमेरिका कसा चालवू शकतो ? अमेरिकेच्या पूर्वजांनी ज्या धर्माच्या आधारे अमेरिकेची स्थापना केली, त्या धर्मावर तुमचा विश्‍वास नसल्यामुळे तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही’, असे अनेकांचे मत आहे’, असे सांगितले. त्यावर रामास्वामी यांनी वरील उत्तर दिले.

१. रामास्वामी पुढे म्हणाले की, मी याच्याशी सहमत नाही. माझा विश्‍वास आहे की, आपण सर्व समान आहोत; कारण देव आपल्या प्रत्येकामध्ये वास करतो. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी मी सर्वोत्तम अध्यक्ष असू शकत नाही; पण हे काम अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचेही नाही. ज्या मूल्यांवर अमेरिकेची स्थापना झाली, त्या मूल्यांचे मी निश्‍चितपणे पालन करीन. मी हिंदु असल्याचे सांगितले. मला शिकवले गेले आहे की, देवाने आम्हा सर्वांना येथे एका उद्देशाने पाठवले आहे. धर्म पालटणारा मी खोटा हिंदु नाही. माझ्या राजकीय कारकीर्दीसाठी मी खोटे बोलू शकत नाही.

२. हिंदु आणि ख्रिस्ती धर्माविषयी रामास्वामी पुढे म्हणाले की, दोघांच्या मूल्यांमध्ये फार साम्य आहे. मी कॅथॉलिक शाळेत शिकलो. मी घरी शिकलो, त्याच गोष्टी मला शाळेत शिकवल्या गेल्या. मी अतिशय पारंपरिक कुटुंबात वाढलो. माझ्या पालकांनी मला शिकवले की, कुटुंब हा जीवनाचा पाया आहे, विवाह हे अत्यंत पवित्र नाते आहे आणि घटस्फोट हा कधीही उपाय असू शकत नाही. मला सांगण्यात आले आहे की, जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मांत ही समान मूल्ये आहेत.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेत हिंदु राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही; मात्र भारतात मुसलमान राष्ट्रपती होऊ शकतो, हे लक्षात घ्या !