वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील हर्रावाला शहरातील श्री कालीमाता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका हिंदुद्वेष्ट्या युवकाने लघुशंका करून नंतर मंदिरावर दगडफेक केली. ही घटना रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. ती सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. हे चित्रीकरण सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर हिंदु संघटनांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर हिंदु संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंदिरात जमले आणि त्यांनी, ‘हिंदुद्वेष्ट्याला लवकर अटक न झाल्यास आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली.
१. हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, याआधीही मंदिरांमधील देवतांच्या मूर्तींची तोडफोड किंवा मंदिराची हानी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; मात्र पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने हे प्रकार सातत्याने घडत आहेत.
२. ‘आरोपीला अटक केल्यानंतरच ‘धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या या व्यक्तीचा हेतू होता का कि तो मानसिकदृष्ट्या वेडा होता?’, हे समजेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ? – संपादक)