वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने पाकव्याप्त काश्मीर परत आणल्यास संपूर्ण देश मत देईल ! – काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी

नवी देहली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वर्ष २०१९ मध्ये ‘पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणू’ असे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला १० वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी हेही ६ वर्षे पंतप्रधान होते. अशा भाजपला पाकव्याप्त काश्मीर परत आणण्यापासून कुणी रोखले आहे ? वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर परत आणून दाखल्यास संपूर्ण देशाची मते मिळतील, असे सांगत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपला आव्हान दिले. ६ डिसेंबर या दिवशी लोससभेत गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्‍न नेहरू यांच्यामुळेच निर्माण झाल्याचे म्हटले होते. त्यावर अधीर रंजन चौधरी यांनी वरील आव्हान दिले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसमुळेच पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला. काँग्रेसनेच तो परत आणणे आवश्यक होते; मात्र मुसलमानांच्या लागूंलचालनासाठी काँग्रेसने राष्ट्रघात करत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता वर तोंड करून अशा प्रकारचे आवाहन करण्याचा काँग्रेसला कोणताही अधिकार नाही ! उलट काँग्रेसने या राष्ट्रघातासाठी कठोर प्रायश्‍चित्तच घ्यायला हवे !