वेस्ट बँकला अस्थिर करणार्या इस्रायलींच्या विरोधात अमेरिकेने आखले धोरण !
वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले की, जे इस्रायली वेस्ट बँक परिसर अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अमेरिकेत ‘फ्री व्हिसा’ नाकारला जाईल. पॅलेस्टिनी लोकांवर होत असलेल्या आक्रमणांमुळे अमेरिकेने ही भूमिका घेतली. यांतर्गत ज्या इस्रायली कट्टरपंथी लोकांना अमेरिकी व्हिसा देण्यात आला आहे, त्यांचा व्हिसा रहित केला जाईल.
ब्लिंकन पुढे म्हणाले की, आमचे नवे व्हिसा निर्बंध धोरण हे अशा कट्टर ज्यू लोकांना व्हिसा देण्यावर प्रतिबंध आणेल, जे वेस्ट बँकमधील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यांच्या विरोधात कार्य करत आहेत.