सहा वेळा आमदार असलेल्या माजी मंत्र्याला केले पराभूत !
रायपूर – छत्तीसगडमधील साजा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ईश्वर साहू विजयी झाले आहेत. साहू हे भुवनेश्वर साहू या २२ वर्षीय तरुणाचे वडील आहेत, जो बेमेटारा जिल्ह्यातील बिरनपूर गावात धर्मांध मुसलमान जमावाने केलेल्या आक्रमणात ठार झाला होता. या जागेवर काँग्रेसचे रवींद्र चौबे यांच्याशी साहू यांची लढत होती. चौबे हे सहा वेळा आमदार आणि भूपेश बघेल यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.
सीतापूरमध्ये माजी सैनिकाने काँग्रेस मंत्र्याचा केला पराभव !
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत सुरगुजा जिल्ह्यातील सीतापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमरजीत भगत यांचा पराभव करणारे भाजपचे रामकुमार टोप्पो चर्चेत आहेत. ३६ वर्षीय टोप्पो हे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जलद कृतीदलामध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ म्हणून तैनात होते. अनेक आंतकवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या रामकुमार टोप्पो यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पोलीस पदक शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. टोप्पो यांनी नोकरीचे त्यागपत्र देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. टोप्पो यांनी बघेल सरकारमध्ये अन्नमंत्री असलेले अमरजीत भगत यांचा १६ सहस्र ९५४ मतांनी पराभव केला. भगत सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.