९ जण अटकेत
सोनभद्र (उत्तरप्रदेश) – येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंना पैशाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्या ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यांतील ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचा आरोप आहे की, हे सर्व जण चंगाई सभेचे (रुग्णांना बरे करण्यासाठी आयोजित सभा) आयोजन करून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून हिंदूंना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न करत होते. या सर्वांच्या गरिबीचा अपलाभ घेतला जात होता. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून ख्रिस्ती धर्माविषयीची पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. अटक करणार्यांपैकी जयप्रभु हा तमिळनाडूचा आहे. त्यासह उत्तरप्रदेशातील अजय कुमार, आंध्रप्रदेशातील चेका इमॅनुअल, राजेंद्र कौल, छोटू रंजन, परमानंद सोहन, प्रेम नाथ प्रजापती आणि राम प्रताप हे आरोपी आहेत. (धर्मांतरित झालेले स्वतःची हिंदु नावे तशीच ठेवतात आणि अन्यांची फसवणूक करतात ! – संपादक)
संपादकीय भूमिकादेशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आणि अशांना शिक्षा होत नसल्यानेच अशा घटना थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते ! |