मोरजी पंचायतीची उपजिल्हाधिकार्यांकडे तक्रार
पेडणे, २ डिसेंबर (वार्ता.) : मोरजी परिसरात रात्री उशिरापर्यंत पार्ट्या (मेजवान्या) चालू असतात आणि यामध्ये ध्वनीप्रदूषण होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, या ध्वनीप्रदूषणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. ध्वनीप्रदूषणावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मोरजी पंचायतीने उपजिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पंचायतीने या तक्रारीसमवेत उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची प्रत जोडली आहे.
संपादकीय भूमिका
|