यालाच तर ‘गुरुकृपा’ असे म्हणतात ।

श्री. संदीप ढगे

मायेतील जगतात रमलेला ‘संदीप’ (टीप १) साधनेकडे वळतो ।
मित्रांच्या संगतीत रमणारा तो सेवेतून आनंद घेऊ लागतो ।
यालाच तर ‘गुरुकृपा’ असे म्हणतात ।। १ ।।

‘थोडी माया अन् थोडी साधना’, असे दोन्ही करतो’, ।
असे म्हणतांना आनंदाने पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतो ।
घर सोडून न रहाणारा तो प्रक्रियेसाठी आश्रमात रहायला येतो ।। २ ।।

दिवसभर सतत भ्रमणभाष वापरणारा संदीप ।
आता साधनेसाठी एक घंटाच भ्रमणभाष वापरतो ।
असात्त्विक अन्न न खाता आश्रमात सात्त्विक महाप्रसाद घेतो ।। ३ ।।

मायेतील जगतात प्रगतीचे स्वप्न बघणारा संदीप ।
आता केवळ गुरुचरण प्राप्तीचा ध्यास धरतो ।
यालाच तर ‘गुरुकृपा’ असे म्हणतात ।। ४ ।।

टीप १ : श्री. संदीप ढगे

– गुरुचरणसेवक,

श्री. संदीप ढगे, सोलापूर (१०.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक