-
पोलीस उपनिरीक्षक घायाळ
-
वाहनांची तोडफोड, गणवेश फाडले
|
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील खातीपाडा भागात पसार गुंड शानू कुरेशी याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करत मारहाण केली. पोलिसांचा गणवेश फाडण्यात आला, त्यांच्या गणवेशावरील नावाची पाटी काढण्यात आली, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या वेळी पोलिसांना ठार मारण्याचीही धमकी देण्यात आली. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक अरुण कुमार हे घायाळ झाले. ही घटना २४ नोव्हेंबरच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी शानू कुरेशी, त्याचे वडील हाजी महंमद, भाऊ याच्यासह इम्रान, गुलफाम, अस्लम, तोतला पठाण, नदीम आदी २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
- ‘भारतात मुसलमान असुरक्षित असून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत’, अशी ओरड करणारे आता कुठे आहेत ?
- अशा प्रकारे पोलिसांवर आक्रमण होत असतांना त्यांना स्वरक्षणार्थ गोळीबार करण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
- उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ?
|