सांगली – जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अपर पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती रितू या वर्ष २०१८ च्या ‘बॅच’च्या ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. गृहविभागाने राज्यातील १० ‘आय.पी.एस्.’ अधिकार्यांचे स्थानांतर केले आहे, त्यात श्रीमती रितू खोकर यांचा समावेश आहे. सांगलीच्या तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे सातारा येथे स्थानांतर झाल्यानंतर गेल्या २ मासांपासून सांगलीचे अपर अधीक्षकपद रिक्त होते.