आरोपीची माहिती देणार्याला पोलिसांकडून पारितोषिकाची घोषणा !
मुंबई – पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत रस्त्यावरून जाणार्या अल्पवयीन मुलीला अडवून, तसेच घराजवळ खेळणार्या अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांतील आरोपींची छायाचित्रे तुळींज पोलीस ठाण्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आरोपींची माहिती देणार्यांसाठी पोलिसांकडून पारितोषिकाची घोषणाही करण्यात आली आहे.
वरील दोन्ही घटनांपैकी शाळेतून घरी येणार्या ७ वर्षांच्या मुलीला अडवण्याची घटना ५ ऑक्टोबर या दिवशी घडली, तर १५ नोव्हेंबर या दिवशी घराजवळ खेळणार्या ९ वर्षाच्या मुलीला आडोशाला नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या दोन्ही घटनांच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्हेगारांचा शोध पोलीस घेत असून नालासोपारा आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
रेहान कुरेशी याच्याकडून अनेक मुलींचे लैंगिक शोषण, तर २०० हून अधिक मुलींचा विनयभंग !वर्ष २०१८ मध्ये नालासोपारा येथे रेहान कुरेशी नावाच्या धर्मांधाने नालासोपारा येथील अनेक मुलींना रस्त्यावर अडवून त्यांचा विनयभंग केला होता. कुरेशी याच्या विरोधात ३ मुलींनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी कुरेशी याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरारोड आणि भाईंदर येथील २०० हून अधिक मुलींचा विनयभंग केल्याचे उघड झाले. (२०० हून अधिक मुलींचा विनयभंग करणार्या धर्मांधाला काय शिक्षा केली, हेही पोलिसांनी सांगावे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|