|
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे ‘लव्ह जिहाद’ चे एक प्रकरण समोर आले आहे. येथे नावेद नावाच्या मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आणि नंतर लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित हिंदु मुलीने पोलिसांत प्रविष्ट केेलेल्या तक्रारीत आरोपी नावेदची आई आणि भाऊ जावेद यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे आणि छळ केल्याचे म्हटले आहे. नावेदने मुसलमान न झाल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. यासमवेतच तिच्या आईचीही हत्या करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला कह्यात घेतले आहे.
पीडित हिंदु मुलीने आरोप केला आहे की, तिचे धर्मांतर करण्यासाठी मौलवीलाही बोलावण्यात आले होते. आरोपी नावेदने यापूर्वीच एका हिंदु मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले होते.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध तो सर्रास धुडकावतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! |