उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रीकरणाद्वारे निश्‍चिती !

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचे चित्रीकरण समोर आले आहे. बोगद्यात ६ इंच रुंद पाइपलाइनद्वारे ‘एन्डोस्कोपिक कॅमेरा’ पाठवण्यात आला. त्याद्वारे कामगारांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या आरोग्याविषयी जाणून घेण्यात आले. कामगारांची मोजणी करण्यात आली.

सध्या सर्व कामगार सुखरूप आहेत. या कामगारांना साहाय्यता पथकाकडून गरम खिचडी बनवून बाटल्यांमध्ये भरून पाइपद्वारे पाठवण्यात आली. गेल्या १० दिवसांत या कामगारांना प्रथमच गरम जेवण मिळाले.